मोदी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला ; काँग्रेसचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाचा विषय हा जोरदार चर्चेत असून आता काँग्रेसने यासाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले होते. 102व्या घटनादुरुस्तीनुसार मराठा आरक्षणाबाबत तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला कायदा बेकायदेशीर असल्याचं केंद्राने सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची ही भूमिका महाराष्ट्रविरोधी असून केंद्राने महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसला आहे, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोदी सरकारनं पूर्णपणे राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्य सरकारनं, म्हणजेच तत्कालीन फडणवीस सरकारनं केलेला कायदा योग्य नाही, असं केंद्रानं न्यायालयात सांगितलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना अॅटर्नी जनरलनी भेट देखील नाकारली होती. राज्य सरकारनं आरक्षणा संदर्भात बोलावलेल्या बैठकीला कायदा मंत्री रविशंकर प्रसाद अनुपस्थित होते. त्यावरूनच या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाचे रंग दिसले होते,’ असा आरोप सावंत यांनी केला.

मोदी सरकारच्या महाराष्ट्र विरोधी भूमिकेवर देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांनी आता उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी करतानाच, मराठा आरक्षण रखडण्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही असं म्हणणाऱ्या भाजपचा त्यांनी जाहीर निषेध केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment