.. तर राज्य सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवलेंचा काळजीपोटी काँग्रेसला सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. तसं असेल तर काँग्रेसनं राज्य सरकारचा पाठिंबा काढावा,’ असा सल्ला रिपब्लिकन नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली.

महाराष्ट्रात ३ पक्षांचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. परिणामी त्यांना पूर्ण गतीने काम करता येत नाही. अशातच काँग्रेस पक्ष नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. काँग्रेसला निर्णयप्रक्रियेत डावलले जात आहे. काँग्रेसच्या ४२ आमदारांच्या पाठिंब्यामुळे हे सरकार अस्तित्त्वात आले. आता त्याचा मित्रपक्षाला डावलणे ही योग्य गोष्ट नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची ही नाराजी दूर केली पाहिजे. अन्यथा काँग्रेस पक्षाने महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढावा, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

गुरुवारी काँग्रेसचे सरकारमधील एक मंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या नेत्यांची बैठकही झाली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह सरकारमधील काँग्रेसचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान मिळावं अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या या नाराजीची दखल घेतली आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी दूरध्वनीवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केली. तर सोमवारी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे काँग्रेसची नाराजी दूर होईल, असा अंदाज आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment