तब लढे थे गोरों से, अब लढेंगे चोरों से; सोनिया गांधीच्या ईडी समन्स नंतर काँग्रेस आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडी नोटीस आली असून 21 जुलै ला चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे.. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनाली मारणे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे गांधी कुटुंबाला त्रास देत मोदी सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस नेतृत्वाची छळवणूक करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

सोनाली मारणे म्हणाल्या, काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना आज ED ने नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशी नोटीस दिली आहे. अशा प्रकारच्या धमक्या, दडपशाहीचे प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाला नवीन नाहीत. देशासाठी तुरुंगवास भोगलेले, अंगावर गोळ्या झेलल्याचा वारसा सोनियाजींना व लाखों काँग्रेस कार्यकर्त्यांना मिळाला आहे. केंद्र सरकार प्रत्येक विरोधी आवाज अशा दडपशाहीतून दाबू पाहत आहे.

बेरोजगारी, महागाई, परराष्ट्र धोरणातील अपयश, शेतकरी, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक व महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात काँग्रेस आणखी जोरदार संघर्ष करील. बंद झालेले हे प्रकरण पुन्हा उकरून काढण्यामागे गांधी कुटुंबाला त्रास देत मोदी सरकार जाणीवपूर्वक काँग्रेस नेतृत्वाची छळवणूक करत आहे. सोनियाजी गांधी यांना हजर राहण्याचे पाठवलेले ईडीचे समन्स हे राजकीय सूडभावनेतूनच आहे. सोनियाजीं गांधी या धाडसी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या सून आणि निडर पंतप्रधान राजीवजींच्या पत्नी असल्याचा विसर मोदी – शहा जोडीने पडू देवू नये असा इशाराही सोनाली मारणे यांनी दिला.

दरम्यान, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांना ईडीने समन्स बजावले असून 21 जुलैला चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे. सोनिया गांधी यापूर्वीच म्हणजे 8 जूनला ईडीसमोर हजर होणार होत्या. मात्र कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी ईडीकडे हजर राहण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी मागितला होता.

Leave a Comment