Saturday, March 25, 2023

अहंकार सोडा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या ; सोनिया गांधींचे मोदी सरकारला आवाहन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एक महिना उलटून देखील यावर काही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. केंद्रातील मोदी सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात अहंकारी सरकार आहे, अशी टीका करतानाच अहंकार सोडा, राजधर्माचं पालन करा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, असं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे.

अजूनही वेळ गेलेली नाही. मोदी सरकारने सत्तेचा अहंकार सोडावा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे मागे घेण्याचा राजधर्म पाळणं म्हणजे या आंदोलनात बळी गेलेल्यांना खरी श्रद्धांजली असेल, असं सोनिया गांधी यांनी सांगितलं.

- Advertisement -

सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, मोदी सरकार हे भांडवलदार धार्जिणे आहे. ठरावीक उद्योजकांना लाभ पोहोचवण्याचं काम मोदी सरकार करत आहे. पण लक्षात ठेवा, लोकशाहीत लोकांचं न ऐकणारे लोक अधिक काळ सत्तेत राहत नाहीत. लोकशाहीचा अर्थ शेतकरी आणि मजुरांच्या हिताचं रक्षण करणं आहे, हे सरकारला समजलं पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’