काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचा उमेदवारी अर्ज दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज संगमनेर मतदारसंघातून दाखल केला आहे. हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. जनतेच्या आशीर्वादाने आपला विजय निश्चित आहे असे मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. त्याच प्रमाणे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सेना भाजप युतीवर टीका देखील केली आहे.

शिवसेना भाजप युती मध्ये सर्व काही आलबेल आहे असे काही नाही. सध्याच्या वातावरणा वरून असे दिसते आहे की त्यांची अंतर्गत धुसपूस आहे. तर सत्तेत असताना देखील शिवसेनेला पीक विम्यासाठी आंदोलन करावे लागले. सेना भाजपमध्ये सत्ता भोगताना एक वाक्यता नव्हती असे बाळासाहेब थोरात यांनी म्हणले आहे.

दरम्यान आज सोमवारी बाळासाहेब थोरात यांनी आपल्या घरातून पायी चालत जाऊन तहसीलदार कार्यालयात आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले आहे. यावेळी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, आमदार सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आणि नगराध्यक्षा दुर्गा तांबे आदी काँग्रेस नेते उपस्थित होते. त्याच प्रमाणे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment