मोदी सरकारने 130 कोटी जनतेला वाऱ्यावर सोडले; नाना पटोलेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारविरोधात आज शेतकऱयांनी भारत बंदची हाक देत आंदोलन केले. या आंदोलनास विविध पक्ष, संघटनांनी देखील पाठींबा दिला. यावेळी काँग्रेस पक्षानेहि या आंदोलनात सहभाग घेतला. अकोला येथील रॅलीदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. “पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत, परंतु मोदी सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही. या सरकारने 130 कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले असल्याची टीका पटोलेंनी केली.

मोदी सरकार विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “गेल्या एक वर्षांपासून काबाड कष्ट करणारे शेतकरी तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत. कृषी कायदे, कामगार कायद्यात बदल करुन शेतकरी, कामगारांना भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचे काम या सरकारने केले आहे.”

केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला आहे. वाढत्या महागाईमुळे देशातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. शेतकरी, कामगार, बेरोजगार, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी देशातील शेतकऱ्यानी ही लढाई सुरु केली आहे. यात काँग्रेसकडूनही पाठींबा आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच ठेवणार असल्याचे पटोले यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment