प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत हातमिळवणी करणार काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि ओवेसीं यांचा एमआयएम यांनी २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही पक्ष राज्यात युती करुन निवडणुका लढणार आहेत. २ ऑक्टोबर गांधी जयंतीला औरंगाबादेत जबिंदा लॉन्सवर युतीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभुमीवर काँग्रेसच्या नेत्यांकडू प्रकाश आंबेडकर यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

एमआयएम आणि भारिप बहुजन महासंघ यांच्या युतीमुळे मतविभाजन होवून काँग्रेसला त्याचा फटका बसणार असल्यामूळे ‘धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी आंबेडकर यांनी महाआघाडीत यावे, जागा वाटपाबाबत सकारात्मक विचार केला जाईल’ असे आवाहन काँग्रेस नेत्यांकडून केले जात आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे आंबेडकरांच्या संपर्कात आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समविचारी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या माध्यमातून विविध पक्ष नेत्यांशी आघाडीचे नेते चर्चा करत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा.राजू शेट्टी, भारिपचे प्रकाश आंबेडकर महाआघाडीत सहभागी झाले तरच बळ वाढणार आहे असे मत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Comment