Tuesday, January 31, 2023

राज्यात २०२४ साली काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल- नाना पटोले

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेचा आधार घेऊनच ते सरकार काम करेल, असा मानस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ते अमरावती येथे काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.

केंद्रातील मोदी सरकारने लोकांना जाणीवपूर्वक मरणाच्या दारात आणून ठेवले आहे. ऑक्सीजन, रेमडेसीवर या औषधांचा पुरवठा केंद्र सरकार करते, तो वेळेवर व पुरेसा न केल्यामुळे हजारो लोकांचे जीव गेले. आताही बुरशी आजारावरचे इंजेक्शन केंद्राकडून वेळेवर व पुरेशा प्रमाणात मिळत नाही. शेतकरी सहा महिन्यापासून आंदोलन करत आहेत पण पंतप्रधान मोदींना या शेतकऱ्यांशी बोलावयास वेळ नाही. भाजपचे सरकार देशाला अधोगतीकडे घेऊन गेले आहे. काँग्रेसचा विचारच या देशाला वाचवू शकतो, संविधानाला वाचवू शकतो असंही ते म्हणाले.

- Advertisement -

दरम्यान राज्यात महाविकास आघाडी सरकार असून देखील नाना पटोले सातत्याने आगामी निवडणुकीबाबत स्वबळाचा नारा देत आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्याशी देखील चर्चा करणार आहे असेही नाना पटोले यांनी म्हंटल होत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.