नवी दिल्ली । सोशल मीडियामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुकने सत्ताधारी भाजपाला झुकते माप दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मंगळवारी फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून काँग्रेसने ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मधील वृत्ताच्या पार्श्वभूमीवर फेसबुकचे भारतातील संचालन आणि भारतातील लीडरशीप टीमची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली पत्रात आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी हे पत्र पाठवले आहे. ही चौकशी एक-दोन महिन्यात पूर्ण करुन त्याचा अहवाल फेसबुकच्या बोर्डाला पाठवावा तसेच अहवाल सार्वजनिक करावा, असे वेणूगोपाल यांनी पत्रात सुचवले आहे. “लेखामध्ये फेसबुक इंडियाच्या नेतृत्वावर स्पष्टपणे एका राजकीय पक्षाची बाजू घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. फेसबुक इंडियावर भारताच्या निवडणूक लोकशाही प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा गंभीर आरोप आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने चौकशी केल्यानंतर फेसबुक इंडियाकडून द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्ट डिलीट करण्यात आल्याचे समजते, हे खरे असेल तर गुन्हा केल्याची ही स्पष्ट कबुली आहे” असे पत्रात म्हटले आहे.
Shri @kcvenugopalmp writes to Facebook CEO, Mark Zuckerberg on Facebook India-BJP links. pic.twitter.com/rnUiN1XfEe
— Congress (@INCIndia) August 18, 2020
व्यावसायिक कारणांमुळे ४ व्यक्ती आणि भाजपाशी संबंधित असलेल्या गटांना हेट स्पीचचा नियम लागू होत नाही, असे फेसबुकच्या भारतातील धोरण संचालकांचे म्हणणे आहे असे वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या वृत्तात म्हटले होते. फेसबुकने भाजप नेत्यांच्या द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्टवर कारवाई केल्यास भारतात कंपनीला व्यावसायिक धक्का बसू शकतो, असे कंपनीच्या धोरण संचालक आँखी दास यांनी आक्षेपार्ह मजकूर व चित्रफिती लक्षात आणून देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”