सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही; कोर्टाने पोलिसांवर केली कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या संपूर्ण देशामध्ये शारीरिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हा कितीही गुन्हा किती मोठा असला, तरी न्यायालयाच्या निर्णयापूर्वी काही करता येत नाही. अशातच उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केलेले आहेत. म्हणजेच आरोपींचा तपास करताना पोलिसांना योग्य ते पुरावे गोळा करता येत नाही. असे देखील सांगण्यात आलेले आहे. बरेलीमध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडली. त्यानंतर न्यायालयाने कठोर भूमिका घेत, त्या व्यक्तीला निर्दोष देखील मुक्तता केलेली आहे. या प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार सहमतीने जे शारीरिक संबंध ठेवतात, ते बलात्काराच्या श्रेणीमध्ये येत नाहीत. तसेच निकृष्ट दर्जाची चौकशी करणाऱ्या निरीक्षकावर कारवाई करण्याच्या देखील आदेश दिलेले आहेत.

या ठिकाणातील माहिती हाती आलेल्या माहितीनुसार कर्मचारी नगर येथे एक 34 वर्षीय महिला राहत होती.तिला तीन मुले देखील आहेत. या महिलेचे शिवम नावाच्या व्यक्तीसोबत 2016 ते 2019 या तीन वर्षाच्या काळात संबंध होते यावर या महिलेने त्या व्यक्तीवर सतत 3 वर्ष बलात्कार केल्याचे आरोप लावलेले आहेत. त्या महिलेच्या सांगण्यानुसार लग्न करेल या गोष्टीची आमिष दाखवून शिवमने तिच्यावर तीन वर्ष बलात्कार केला आहे. त्यानंतर त्या महिलेने प्रेम नगर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध तक्रार देखील केली. यानंतर या प्रकरणाची खूप तपासणी झाली आणि महिलेने हे आरोप फेटाळले आणि तरुणाची निर्दोष मुक्तता देखील केली आहे.

या केसमध्ये कोर्टाने असे म्हटले आहे की, जर एखाद्या महिलेला तीन मुले आहेत. तर ती लग्नाच्या जाळ्यात कशी काय अडकू शकते? ही 34 वर्षीय महिला घटस्फोटीत नव्हती किंवा ती अविवाहित देखील नव्हती. तिचा विवाह झालेला असून तिला तीन मुले होती. परंतु यातून असे निदर्शनास आले की, या तीन वर्षात झालेला सर्व प्रकार हा त्या महिलेच्या संमतीने झालेला होता. त्यामुळे ही केस बलात्कारामध्ये येत नाही, असे कोर्टाने सांगितलेले आहे. त्यामुळे त्या पुरुषाला निर्दोष मुक्त केलेली आहे. तसेच न्यायालयाने त्या महिलेला दंड देखील ठोठावला आहे. या महिलेने तरुणावर लग्नासाठी दबाव टाकला होता. आणि पोलिसांची चांगले समन्वय साधून तरुणाला अडकवले असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे महिलेने हा संपूर्ण प्लॅन केला होता. आणि यामध्ये पोलिसांनी तिला मदत केल्यामुळे त्या पोलिसाला पोलिसावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे.