छोट्या उद्योग धंद्यांना दिलासा! सेंट्रल बँकेने सुरु केली Emergency Loan ची सर्व्हिस; ‘असा’ करून घ्या फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संकटात सूक्ष्म, लघु तसेच मध्यम प्रकारच्या उद्योगांना अतिरिक्त वर्किंग कॅपिटल देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक आपत्कालीन कर्ज सेवा सुरू केली आहे. यासाठी बँकेने गॅरंटेड इमर्जन्सी क्रेडिट लाइन (जीईसीएल) लागू केली आहे. कोरोना संसर्गामुळे सध्या सर्व प्रकारचे उद्योगधंदे बंद पडले आहेत, त्यामुळे बँकेच्या पुढाकाराने या उद्योगांना दिलासा मिळणार आहे.

सध्याच्या अनलॉक कालावधीमध्ये यातील अनेक उद्योग हळूहळू पुन्हा सुरू होत आहेत, मात्र त्यांच्यासमोर वर्किंग कॅपिटलची मोठी समस्या उभी आहे. कोरोनाच्या सध्याच्या काळात व्यवसाय नसल्यामुळे दररोजच्या कामासाठीही भांडवल उपलब्ध नाही आहे. त्यामुळे या उद्योगांना अशा अडचणीपासून वाचवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही सेवा सुरू केली गेली आहे.

या गोष्टींसाठी कर्जाचे पैसे खर्च केले जाऊ शकतात
ही सेवा एमएसएमई उद्योग परत सुरू करण्यासाठी वापरली जाईल. जीईसीएल अंतर्गत बँका वर्किंग कॅपिटलसाठी एका निश्चित मुदतीसाठीचे कर्ज देईल. महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार २९ फेब्रुवारी २०२० रोजी एमएसएमई कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या एकूण निधीपैकी २० टक्के रक्कम ही कर्जाच्या रूपात बँकेतून मिळू शकते. त्याची कमाल मर्यादा ही ५ कोटी इतकी आहे. ही आर्थिक मदत उद्योजक कच्चा माल खरेदी करण्यासाठी, मजुरांना पगार, नुकसान भरपाई, इतर कामकाजासाठी तसेच वैधानिक खर्चासाठी वापरू शकतात.

गृहकर्जावरील व्याज दर कमी झाले
या कर्जासाठी रेपोसह बँकेने व्याज आकारले आहे जे दरवर्षी ७.५० टक्के इतके असेल. यासाठीचे प्रक्रिया शुल्क बँकेने पूर्णपणे माफ केलेले आहे. त्याचप्रमाणे या कर्जासाठी कोणतीही हमी फी किंवा दंडात्मक व्याज आकारले जाणार नाही. ही आर्थिक मदत बँकेने आधीच मंजूर केलेल्या कर्जाच्या रूपात दिली जाईल. रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर कमी केल्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी बँकेने गृहकर्जावरील व्याज दर वार्षिक ६.८५ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment