व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नागरिकांना दिलासा! शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठी वाढ

औरंगाबाद – औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठ्यात 11 दल लिटर्सने वाढ झाली आहे. महानगरपालिका, जीवन प्राधिकरण तसेच एमआयडीसीने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री सुभाष देसाई यांनी औरंगाबाद येथील पाणी प्रश्नाचा आढावा घेतला. त्यानंतर शहराच्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा झाली. औरंगाबाद शहरासाठी सध्या हर्सूल, जायकवाडी, फारोळा तसेच एमआयडीसीने वाढवून दिलेल्या 3 एमएलडी पाण्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. याशिवाय हाती घेतलेल्या विविध 42 प्रकाराच्या कामांमुळे पाणी पुरवठ्याच्या सध्याच्या कालावधीत आणखी सुधारणा होईल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला. औरंगाबादमधील नागरिकांना 3 ते 4 दिवसांनी पाणी मिळण्याचे नियोजन केले जात असून प्रयत्नांची पराकाष्टा केली जाईल, असा विश्वास औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

 

दरम्यान, शहराला 11 दल लिटर्स पाणी पुरवठा उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे तसेच जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.