हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून खून करण्याचा प्रयत्न केला, असा खळबळजनक दावा भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी केला. राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोकं मुंबईत आणली गेली. धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं असं त्या लोकांना सांगितलं,बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन ठरवायचं होतं असा गंभीर आरोप धस यांनी केला.धस यांच्या या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण सुरेश धस यांनीच उचलून धरलं होते. धस यांच्या आक्रमक पावित्र्यामुळेच वाल्मिक कराड आणि त्याची टोळी आज तुरुंगात आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या जोडगोळीचा उल्लेख आका आका असं धस यांनी संपूर्ण बीड जिल्ह्यात आपली नवी इमेज तयार केली.सुरेश धस म्हणजे देशमुख कुटुंबियांसाठी मसीहा झाले होते. पण तेच सुरेश धस त्यांचा कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्यामुळे चांगलेच बॅकफूटला गेले होते. खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या बॅटनं अमानुष मारहाण, उधळलेल्या नोटा, हरणाच्या शिकारी यांवरुन धस अडचणीत आले होते. धस यांच्या सपोर्टमुळे खोक्या भोसले सुद्धा बीड मध्ये हौदोस घातलाय असा मेसेज गेला. त्यानंतर आता सुरेश धस यांनी खोक्यावरून आपल्या हत्येचा कट कसा रचण्यात आला याची माहिती दिली. सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात विमानाची तिकीटं फाडून राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोकं थेट मुंबईत आणण्यात आली. त्यांना खोक्यानं सुरेश धसांना हरणाचं मांस कसं पुरवलं याबाबत सांगितलं अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.
खोक्या भोसले हा वाळू कॉन्ट्रक्टर आहे, तो वनविभागाच्या जागेत राहत होता. बेनटेक्सचे दागिने घालून फिरत होता. मुथोट फायनान्समधून आणलेले पैसे तो उधळत होता. त्याच्याकडे ४ ते ५ लाखांचीही प्रॉपर्टीही नसेल. त्याच्या घरात वाघार बिघारचं मांस सापडलं असेल. पण तेच वनविभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांनी उचलून नेलं. आता पारध्याच्या घरात थोडंच पंचांग वगैरे सापडणार आहे, असा टोलाही सुरेश धस यांनी लगावला. तसेच परळीचे मुंडे आष्टीमध्ये आले, सुरेश धसला खोक्यानं हरणाचं मांस पुरवलं, असा आरोप केला. माझ्यावर एवढी वाईट पाळी आली का, माझ्या आयुष्यात 16 वर्षे मी माळकरी राहिलेला माणूस आहे. आयुष्यात हरणाच्या मांसापर्यंत कधीच गेलो नाही असं म्हणत धस यांनी स्वतावरील आरोप फटाळून लावले.