औरंगाबाद : कामगाराच्या खिशामध्ये गांजा सापडल्या नंतर कंपनी व्यवस्थापनाने पोलीस ठाण्यात अर्ज दिला. त्या अर्जावरून लेबर कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी दीड लाखाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती साठ हजार रुपये स्वीकारताना एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातील हवालदाराला अटक करण्यात आली.
या प्रकरणात उपनिरीक्षक सतीश पंडित यांचीही चौकशी करण्यात आली आहे परंतु त्यांचा थेट संबंध नसल्याचे समोर आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.एसीबीचे अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे यांनी सांगितले की, एका कंपनीतील कामगारांच्या खिशात तंबाखूमध्ये गांजा असल्याचे आढळून आले होते. तो कंत्राटी कामगार होता त्यावरून कंपनीने एमआयडीसी वाळुज स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला होता. गणेश ज्ञानेश्वर अंतरप (बक्कल क्रमांक 249) असे या हवालदाराचे नाव आहे. ज्या दिवशी अर्ज दिला त्या दिवशी उपनिरीक्षक पंडित हे ड्युटी ऑफिसर होते. तर हवालदार अंतरप हा पीएसओ होता. अंतरपने अर्ज घेऊन स्वतःकडे ठेवला. कामगाराला पुन्हा यावे लागेल म्हणून सोडून दिले.
कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या अर्जावरुन पोलिसांचे हात हे केवळ संबंधित कामगारांपर्यंत पोहोचत होते परंतु पैशासाठी हपापलेल्या अंतरपने थेट लेबल कॉन्ट्रॅक्टरला बोलावून तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. अशा धमक्या द्यायला सुरुवात केली. म्हणजे कर्मचारी असूनही त्याने तब्बल अडीच लाख रुपयांपासून लाचेची मागणी सुरू केली होती शेवटी तो दीड लाख रुपयावर थांबला होता. त्याचबरोबर कामगारांच्या खिशात गांजा सापडला. तर त्याच दिवशी संबंधित कंपनी व्यवस्थापनाची तक्रार अर्जावर किंवा त्यांना फिर्याद द्यायला सांगून पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही.