हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Constipation Relief) रोजच्या धावपळीत आरोग्याकडे लक्ष द्यायला कुणाकडे वेळ आहे? त्यामुळे अपुरी झोप, अवेळी आणि चुकीचे खाणे, आरोग्य सवयी आणि अशीच एकंदर ही बिघडलेली जीवनशैली रोज थोडं थोडं आपलं आरोग्य खराब करते. बऱ्याच लोकांना सकाळच्या गडबडीत नाश्ता करता येत नाही. तर काहींना वेळेत दुपारचे जेवण करता येत नाही. असेही काही बिझी लोक आहेत ज्यांना अख्ख्या दिवसात कामासमोर खायची प्यायची शुद्ध उरत नाही. अशा बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अपचन, बद्धकोष्ठता, पोटफुगीची समस्या निर्माण होते.
मग अशा त्रासांपासून सुटका हवी म्हणून विविध औषधे, गोळ्या खाल्ल्या जातात. तुम्हालाही असे त्रास होत असतील तर अशा गोळ्या किंवा विविध औषधे घेण्याची गरज नाही. (Constipation Relief) कारण आज आम्ही तुम्हाला पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम देतील अशी ३ घरगुती पद्धतीने तयार केली जाणारी पेय सांगणार आहोत. ज्यांच्या सेवनाने तुम्हाला त्वरित आराम मिळेल. चला जाणून घेऊया.
1) लिंबू पाणी (Constipation Relief)
लिंबाचे अनेक पोषक गुणधर्म आपल्या शरीराला विविध लाभ देतात. त्यात पोटाशी संबंधित समस्या असेल किंवा बद्धकोष्ठतेने त्रस्त झाले असाल तर अशावेळी लिंबू पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. कारण हे पेय आपल्या शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. परिणामी पोटाशी संबंधित समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. यासाठी १ ग्लास गरम पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या.
2) मेथी दाण्याचे पाणी
मेथी दाण्याचे पाणी खास करून मधुमेहींसाठी चांगले. या पाण्याचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित कोणतीही समस्या दूर होते. यासाठी मेथी दाणे तव्यावर गरम करा आणि त्यांची बारीक पावडर करा. (Constipation Relief) साधारण १ चमचा पावडर पाण्यात मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या.
3) तांदळाचे पाणी
ज्या लोकांना यूटीआयची समस्या असेल त्यांनी तांदळाचे प्यावे. यासाठी अर्धा कप कच्चा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून त्यात २ ते ३ कप पाणी घाला आणि अर्धा तास भिजत ठेवा. (Constipation Relief) या तांदळाचे पाणी एका स्वच्छ भांड्यात काढा आणि त्याचे सेवन करा. याचे सेवन केल्यास पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळेल.
4) सब्जाचं पाणी
बिघडती जीवनशैली बद्धकोष्ठतेच्या त्रासामागील मूळ कारण आहे. या त्रासापासून सुटका हवी असेल तर सब्जाच्या बियांचे पाणी प्या. यासाठी १ चमचा सब्जा बी ग्लासभर पाण्यात सुमारे १५ मिनिटे भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या. लगेच आराम मिळेल.
5) आल्याचं पाणी
अपचन, पोटफुगी, ऍसिडिटी, सूज अशा समस्यांपासून त्वरित आराम हवा असेल तर आल्याचे पाणी प्या. (Constipation Relief) यासाठी, एका भांड्यात २ चमचे आल्याचा किस आणि ४ कप पाणी घ्या. कमीतकमी १० मिनिटे हे पाणी उकळवा आणि नंतर कोमट होताच रिकाम्या पोटी प्या.