सातारा प्रतिनिधी । राजवैभव शोभा रामचंद्र या संविधानप्रेमी कार्यकर्त्याकडून संविधान जागराचा कार्यक्रम साताऱ्यात घेण्यात आला. सातारा शहरातील ६ शाळा – महाविद्यालयांमध्ये आणि एका बुद्ध विहारामध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
लोकभाषेचा आधार घेत ओव्या, भारुड यांच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने संविधान समजावून सांगण्याचं काम राजवैभव मागील ३ वर्षांपासून करत आहे. मागील ३ महिन्यांत महाराष्ट्रातील ५० हून अधिक ठिकाणी संविधान जागराचं काम राजवैभवने केलं आहे. साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कॉलेज, भीमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, लालबहादूर शास्त्री महाविद्यालय, महाराजा सयाजीराव विद्यालय, विशाल सह्याद्री शाळा आणि लुम्बीनी बुद्धीविहार येथे संविधान जागराचा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सुगत लर्निंग अकॅडमीतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी सोप्या भाषेत संविधान समजल्याची भावना व्यक्त केली. सुमित वाघमारे आणि सोनम पोवार यांनी हा जागर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
जिवंतपणी अनाथ अन मृत्यूनंतरही यातनाच; माणुसकीला काळिमा फासणारी घटना
फिरा मनसोक्त! खर्च मोदी सरकार देईल; जाणून घ्या काय आहे हा उपक्रम