घाटीत महिलांसाठी 40 ऑक्सिजन खाटांच्या वॉर्डची निर्मिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नाने घाटीत जुन्या मेडिसिन विभागाच्या इमारतीत नवीन वॉर्डची निर्मिती होऊन वैद्यकीय सेवेस सुरुवात झाली. या वॉर्डचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.

घाटीमध्ये मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशातील रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी दाखल होतात. त्यांना अधिक चांगल्या प्रकारची सेवा देण्यासाठी या नवीन वॉर्डचा अधिक उपयोग होणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. त्याचबरोबर या नवीन वॉर्डात दाखल झालेल्या रुग्णांशी मनमोकळा संवाद साधला. या वॉर्डमध्ये सध्या कोविड निगेटीव्ह महिला रुग्णांवर उपचार करण्यात येतात.वॉर्डचे उद्घाटन जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलन करुन झाले. त्यानंतर त्यांनी वॉर्डातील सोयीसुविधा, साहित्याची गुणवत्ता आदींबाबत प्रत्यक्ष पाहणी करुन घाटी प्रशासनास योग्य त्या सूचनाही केल्या. तसेच रुग्णांना आवश्यक असणाऱ्या औषधी चव्हाण यांनी भेट दिल्या.

त्यानंतर त्यांनी वॉर्डच्या बाजूस उभारण्यात आलेल्या चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲंड ॲग्रीकल्चर (सीएमआयए)च्या वतीने घाटीस देण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचीही पाहणी केली.

Leave a Comment