कंटेनरच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; 7 जणांचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहमदनगर जिल्ह्यातील पोहेगाव कोपरगाव रोडवर रिक्षाला कंटेनर ने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये 2 पुरुष आणि 2 विद्यार्थीनीचा समावेश आहे.

माहितीनुसार, समोरून येणाऱ्या मोटारसायकल ला कट मारण्याच्या प्रयत्नात कंटेनरने प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. रिक्षातून प्रवास करणाऱ्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी, दोन महिला आणि दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर सदर कंटेनर चालक अपघाती स्थळावरून प्रयत्न करत असतानाच तेथील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

अपघातातील मृतांची नावे-

1)राजाबाई साहेबराव खरात (वय ६० वर्षे रा. चांदेकसारे, ता कोपरगाव)

2)प्रगती मधुकर होन (वय २० वर्षे रा. चांदेकसारे, तालुका कोपरगाव) यांचा समावेश आहे.

3)आत्माराम जम्मानसा नाकोडे (वय ६५ वर्षे रा. वावी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक)

4)शैला शिवाजी खरात (वय ४२ वर्षे रा.श्रीरामपुर),

5)शिवाजी मारुती खरात (वय ५२ रा. श्रीरामपूर)

6)पुजा नानासाहेब गायकवाड (वय २० वर्षे रा. हिंगणवेढे)

7) रुपाली सागर राठोड (वय 40 वर्षे  रा. सिन्नर)

Leave a Comment