औरंगाबाद-पुणे महामार्गावर कंटेनर व ट्रकचा अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद-पुणे महामार्गावर नवीन कायगाव (ता.गंगापूर) येथे कंटेनर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या रस्ता अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान ऊस ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने त्यामधील उसाचे टिपरे रोडवर पांगले आहे. तसेच रोडच्या बाजूने गॅस पाईप लाईनचे खोदकाम सुरू असल्याने मातीचे ढीग पडले आहे. त्यामुळे हायवे रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमंडल्याने दोन्ही बाजूने तीन किलोमीटर अंतरापर्यन्त वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. यात ऊस वाहतूक करणारा ट्रक पलटी झाला. त्यातील ऊसाचे टिपरे रोडवर पसरली आणि ट्रक रोडवर आडवा झाला.

रस्त्याच्या बाजूला गॅस पाईप लाईनचे खोदकाम सुरू असल्याने मातीचा ढीग पडल्याने वाहने निघण्यास अडथळा झाला. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमंडल्याने दोन तीन किलोमीटर अंतरापर्यन्त वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्ता अपघाताची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या अपघातात केवळ कंटेनर चालकालाच जबर मार लागला आहे. त्यास तात्काळ दाखवण्यात पोहोचवले. रास्ता अपघातामुळे कोलमंडलेली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

पर्यायी मार्ग म्हणून पुणे, नगरहुन औरंगाबादला जाणारी वाहने जुने कायगावमार्गे गंगापूर आणि तेथून भेंडाळा फाट्यावर वाहने काढून औरंगाबाद पुणे हायवे रोडला मार्गस्थ करण्यात आली. आणि औरंगाबादहुन नगर, पुणे जाणारी वाहतूक भेंडाळा फाट्यावरून गंगापूर मार्गे जुने कायगावहुन औरंगाबाद-पुणे हायवे रोडला वळविण्यात आली. आणि जी वाहने रस्ता अपघातात अडकली होती त्यांची निघण्याची मोठी अडचण झाली. वाहतूक ठप्पमुळे अनेकांची महत्त्वाची कामे हुकली, तर शालेय विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची गैरसोय झाली. दरम्यान अपघातग्रस्त दोन्ही वाहनांची मोठी नुकसान झाली. पण सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र ऊस वाहतूक ट्रक मधील उसाच्या टिपरांची मोठी नुकसान झाली आहे. रोडवर पसरलेले उसाचे टिपरे जेसीबीच्या साहाय्याने गोळा करून रस्ता बाजूला करण्यात आले आणि अपघातग्रस्त वाहने पोकलेंडने उचलून रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. तब्बल तीन-चार तास नंतर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.आणि रस्त्याच्या जामिंगमध्ये अडकलेल्या वाहनधारक, प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Leave a Comment