उभ्या ट्रकवर कंटेनर आदळून चालक ठार; झाल्टा फाट्यावर घडला अपघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : बीडच्या दिशेने कुरियर घेऊन जाणारा कंटेनर उभ्या ट्रकवर आदळला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला. उपचारांदरम्यान घाटी रुग्णालयात गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्टा फाटा येथे घडला. फिरोज बुन्‍दू खान असे मृताचे नाव आहे.

उत्तर प्रदेशातील सरताज मोहम्मद आजाद मोहम्मद वय 24 (रा. हाशमपूर) हा त्याचे भावजी फिरोज खान असे दोघे पुण्यातील दादाभाऊ आनंदा झांजड यांच्या कंटेनर क्र. (एमएच- 14 एचजी- 7199) यावर चालक आहेत. 21 जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास फिरोज खान व सरताज हे दोघेही गुजरातमधील असराली आली येथील कुरियर घेऊन हैदराबाद येथील समशाबादकडे जाण्यासाठी निघाले. बीडकडे जाताना झाल्टा फाट्यावरील हॉटेल समोर मध्यभागी ट्रक (टीएन-24 एफ- 4732) उभा होता. यावेळी सरताज यांच्या कंटेनर डाव्या बाजूने उभ्या ट्रकवर आदळला.

यात सरताज यांना किरकोळ तर फिरोज खान यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे फिरोज खान यांना सुरुवातीला खाजगी आणि अधिक उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. सायंकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. चिखलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. संताजी यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment