गॅस पाइपलाइनसाठी खोदलेल्या खड्ड्याच्या मलबामध्ये अडकला कंटेनर; अर्धा तास वाहतूक कोंडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | वाळूज येथील पंढरपुर जवळ शुक्रवारी तीन वाजेच्या सुमारास कंटेनर चिखलात फसला होता यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे एस क्लब पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाहेर काढल्या नंतर वाहतूक कोंडी दूर झाली.

औरंगाबादेतून नगरच्या दिशेने जाणारा कंटेनर पंढरपुरातील देवगिरी बँकेजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका गोडाऊनकडे वळण घेत असताना गॅस पाईपलाईन साठी खोडलेल्या गड्यात फसला. एन.एल.०१, एन.७९४६ असे या कंटेनरचा नंबर होता. या रस्त्याच्या मध्यभागी हा कंटेनर अडकल्यामुळे या रस्त्यावर जवळपास अर्धा तास वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे वाहनधारकांची चांगलीच फजिती झाली. यावेळी काहींनी तिथेच थांब तर काहींनी परतीचा रस्ता स्वीकारत कामगार चौकात मार्ग काढला. शेवटी क्रेनच्या मदतीने हा चिखलात अडकलेला कंटेनर काढण्यास यश आले.

काही दिवसापासून औरंगाबाद नगर रोड वर गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम सुरू आहे. यामुळे वाळूज पंढरपूर रोडवर बऱ्याच ठिकाणी खोदकाम सुरू आहे. तसेच हे खोदकाम केल्यानंतर मलबा व्यवस्थितपणे जमिनीच्या लेव्हल पर्यंत करण्यात न आल्यामुळे आणि त्यावर पाऊस पडल्यानंतर तिथे चिकल होत आहे. याच मुळे अपघात आणि वाहतूक कोंडी चे प्रकार होत आहे.

Leave a Comment