कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; कराड शहरातील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

भेदा चौक ते पोपटभाई चौकाकडे जाणार्‍या झेंडा चौकात कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकल वरील एक जण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवार दि. 16 रोजी रात्री एक वाजता घडला. कावली वंमशी किरण (रा. एम्पायर हिल आगाशिवनगर) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तर या अपघातात सचिन कचरू गायकवाड (रा. आगाशिवनगर ता. कराड) हे गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनर भरधाव वेगात चालवून अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंटेनर चालकावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, मंगळवारी रात्री भेदा चौक ते पोपटभाई चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर झेंडा चौक येथे कंटेनर वरील चालकाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील कावली किरण हे मयत झाले. तर सचिन गायकवाड या अपघातात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघात ठिकाणाचा पंचनामा केला. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनर चालकाचे विरोधात कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment