हिंगोलीत मुजोर कंत्राटदाराकडून मजुरांवर गोळीबार, दोन जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली प्रतिनिधी। हिंगोली इथं सुरू असलेल्या महामार्गाच्या कंत्राटदाराने मजुरांवर गोळीबार केल्याची घटना कनेरगाव नाका परिसरात घडली. पैशाच्या कारणावरून वाद घालीत कंत्राटदाराने आपल्याकडील पिस्तुलने मजुरांवर दोन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात संजय कुमार व हरिराम निषाद हे दोन मजूर जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी हिंगोली इथं हलविण्यात आल आहे.

जखमी झालेले दोन्ही मजूर उत्तर प्रदेशमधील प्यारेपुर येथील राहणारे आहेत. काम करून आपली उपजिवीका भागवण्यासाठी ते महाराष्ट्रात आले होते. मात्र कंत्राटदाराकडून पैशाच्या उचलीच्या कारणावरून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघेही गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कंत्राटदार संतोष सिंग, आसाराम सिंग आणि रवी कुमार गौतम यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक पिस्तूल उर्वरित गोळ्यांसह जप्त केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment