ही विश्वासघातकी अन् निर्लज्जबाई…; नीलम गोऱ्हेंविषयी बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली

0
15
Sanjay Raut - Neelam Gore
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राजधानी दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) सुरू आहे. या संमेलनामध्येच शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिवसेना ठाकरे गटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या याच वक्तव्यावरून संताप व्यक्त करत संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधताना, “ही विश्वासघातकी अन् निर्लज्जबाई” असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी काय कमी केलं तिला द्यायला. नीलम गोऱ्हे यांचं कर्तृत्व काय होतं? मला आठवत आहे बाळासाहेब ठाकरे बोलले होते ही बाई कोण आणली तुम्ही पक्षांमध्ये, कुठलं ध्यान आणलं आहे पक्षात आपल्याला शिव्या घालणारं. काही लोकांच्या मर्जी खातिर त्या आल्या गेल्या चार वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटामध्ये घाण करून दिल्या,”

त्याचबरोबर, “काल नीलम गोऱ्हे या बाहेर पडताना बोलत होत्या की, मी महामंडळाला 50 लाख दिले आहेत. मी उषा तांबे यांना पैसे दिले असल्याचे बोलल्या आहेत. लोकांनी हे रेकॉर्ड केलं आहे. जर ती मर्सिडीज देते असं ही म्हणते तर ती 50 लाख देऊ शकते. प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करायला किती पैसे घेतात याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. पुराव्यासह आहे. नीलम गोऱ्हे यांचे कालचं वक्तव्य हे विकृती आहे. ते मातोश्रीवर असा आरोप कसा लावू शकतात” अशा शब्दात राऊत यांनी टीका केली आहे.

इतकेच नव्हे तर, “शरद पवार हे जेष्ठ आहेत. शरद पवार हे साहित्य संमेलनाचे पालक आणि स्वागताध्यक्ष आहेत. ज्या प्रकारचे कार्यक्रम दिल्लीमध्ये ठरवण्यात आले. यामध्ये राजकीय चिखलफेक झाली. यासाठी ते देखील तेवढेच जबाबदार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी यांच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे. शरद पवार यांनी देखील निषेध व्यक्त केला पाहिजे. शरद पवार गप्प कसे काय राहू शकतात?” असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

दरम्यान, साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या की, “मला ८-१० वर्षांनी कळलं, सगळ्यांची सगळ्यांसोबत मैत्री आहे. त्यामुळे वेगळ्या पंगतीत जाण्याचा प्रश्न नाही. आपण पंगतीत वेळप्रसंगी वाढणारे झालो, तर आपण समानतेने वाढू. पंगतीप्रपंच करणार नाही हा विचार माझ्या मनात आला. त्याचबरोबर, “ठाकरेंच्या गटात दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची” असा आरोप देखील त्यांनी लावला.