हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी आज एका हिंदू महिला शिक्षिकेची हत्या करण्याची घटना घडली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. शाळेत घुसून सर्वांसमोर महिलेवर गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरेल आहे. या घटनेवरुन जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. “आता सर्व मारले जाणार,”असे विधान अब्दुल्ला यांनी केले आहे.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भरदिवसा शाळेत घुसून. रजनी बाला या नावाच्या एका हिंदू शिक्षिकेची हत्या करण्यात आली. या हत्येबाबत माजी मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी माध्यमांशी संवाद साधताना वादग्रस्त विधान केले. त्यांच्या या वादग्रस्त विधानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
#KulgamTerrorIncidentUpdate: Injured lady teacher, a #Hindu & resident of Samba (Jammu division) #succumbed to her injuries. #Terrorists involved in this #gruesome #terror crime will be soon identified & neutralised.@JmuKmrPolice https://t.co/8rZR3dMmLY
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) May 31, 2022
काश्मीर पंडितांवर होत असलेल्या हल्ल्यांवर माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला काही दिवसांपूर्वी असेच एक मोठे विधान केले होते. त्यांनी हल्ल्याचा संबंध थेट काश्मीर फाईल्स या चित्रपटाशी जोडला होता. काश्मीर पंडितांवर होत असलेले हल्ले रोखायचे असतील तर या चित्रपटावर बंदी घालावी, अशी त्यांनी मागणीही केली होती. देशातील मुस्लिमांच्या विरोधात द्वेषाचे वातावरण असून काश्मीर मुस्लिम तरुणांमध्ये त्याचीच मोठ्या प्रमाणात चीड आहे. त्यामुळेच अशा पकारचे हल्ले होत असल्याचे अब्दुल्ला यांनी म्हंटले होते. आता त्यानांतर त्यांनी आज पुन्हा सर्वजण मरणार असे विधान केले आहे.