धनंजय मुंडेंविषयी बोलताना जाणकारांची घसरली जीभ; म्हणाले…

jankar and munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याला धनंजय मुंडे यांचाच पाठिंबा असल्याचा गंभीर आरोप देखील या प्रकरणात केला जात आहे. त्यामुळे विरोधक मुंडे यांच्या राजीनाम्याची तीव्र मागणी करत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी मुंडे यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

जानकार यांचे वक्तव्य

धनंजय मुंडेंवर टीका करताना उत्तम जानकर म्हणाले की, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याची वेळ का येत आहे? हे राज्य अत्यंत नैतिक होतं. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील यांनी एक चुकीचा शब्द गेला म्हणून नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिलेला होता. धनंजय मुंडे यांनी तर रानबाजार मांडला आहे. यांच्यावर अत्यंत घाणेरडे आरोप आहेत. स्त्री वेश्या असल्याचं आपण पाहिलं, मात्र पुरुष वेश्या असल्याचं दिसत आहे”

त्याचबरोबर, अशा पद्धतीचे मंत्री असतील आणि अजित पवार हे त्यांना सोबत घेऊन राज्य चालवत असतील तर या राज्याने यातून काय घ्यायचं? आता हे सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, राज्यामध्ये बीड प्रकरणाचे चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी देखील या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.