IPL च्या नव्या संघावरून वाद वाढला, BCCI ला केले टार्गेट; सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्याही IPL संघ खरेदी करू शकतात का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दोन नवीन आयपीएल संघांच्या मालकांबाबत वाद वाढत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी आता आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी BCCI वर निशाणा साधला आहे. त्यांनी बोर्डावर गंभीर आरोप केला आहे की – ‘सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्याही आयपीएल संघ खरेदी करू शकतात का?’

भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) RPSG Ventures Limited आणि Irelia Company Pte Ltd. (CVC Capital Partners) यांची 2022 पासून नवीन IPL संघांचे मालक म्हणून नियुक्ती केली आहे. RPSG ग्रुपने 7,090 कोटी रुपये देऊन लखनौ फ्रँचायझी घेतली तर CVC Capital ने अहमदाबाद फ्रँचायझी जिंकण्यासाठी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली (रु. 5,600 कोटी) लावली.

ललित मोदी यांनी केले ट्विट
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या घोषणेनंतर ललित मोदी यांनी BCCI वर निशाणा साधत ट्विट केले. त्यांनी लिहिले की “मला असे वाटते की आता सट्टेबाजी कंपन्या देखील आयपीएल संघ खरेदी करू शकतात. नवा नियम असावा. साहजिकच, एक योग्य बोली लावणारा देखील मोठ्या सट्टेबाजी कंपनीचा मालक आहे. पुढे काय? BCCI आपला गृहपाठ नीट करत नाही का? अशा वेळी Anti-corruption काय करू शकते? ”

CVC Capital तपासणीखाली – रिपोर्ट
Outlook ने आपल्या एका रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की, “CVC Capital सट्टेबाजी कंपन्यांशी असलेल्या संबंधांची चौकशी करत आहे.” या रिपोर्ट्सनंतर, नवीन आयपीएल टीम अहमदाबाद फ्रँचायझीची बोली जिंकणारी CVC Capital वादात सापडली आहे.

रिपोर्ट्सनुसार, BCCI चे लक्ष CVC Capital च्या व्यावसायिक क्रियाकलापांवर होते. मात्र सोमवारी financials ओपन होण्यापूर्वी “verification stage” याची दखल घेतली गेली नाही, हे आश्चर्यकारक आहे.

बेटिंग आणि जुगार कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक
CVC Capital पार्टनर्स बेटिंग कंपन्यांसोबतच्या संबंधांमुळे अडचणीत आले आहेत. रिपोर्ट्सनुसार, CVC Capital ने सट्टेबाजी आणि जुगार कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

2013 मध्ये मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीमुळे आयपीएलची बरीच बदनामी झाली होती. याच कारणामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन सीझन्ससाठी बंदी घालण्यात आली होती. अनेक माध्यम संस्थांनी या प्रकरणी BCCI शी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र बोर्डाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a Comment