Copper Bottle Cleaning Tips | तांब्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी वापरा या घरगुती गोष्टी; क्षणार्धात येईल चमक

Copper Bottle Cleaning Tips
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Copper Bottle Cleaning Tips | आपल्याकडे अनेक शतकापासून तांब्याची भांडी वापरतात. अगदी स्वयंपाक करण्यापासून ते पाणी पिण्यापर्यंत तांब्याचा भांड्याचा वापर केला जात होता. आणि पुन्हा एकदा ही प्रथा प्रचलित होत आहे. अनेक लोकांनी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून विचार करून तांब्याच्या बाटल्यांमध्ये पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे. तांब्याच्या बाटल्यांमधून पाणी पिले तर आपल्या आरोग्यासाठी ते खूप फायदेशीर असते. त्याचप्रमाणे आपल्या पर्यावरणासाठी देखील चांगला पर्याय ठरू शकते. आता या तांब्याच्या बाटलीत पाणी पिल्याने आपल्या शरीराला नक्की कोणते फायदे होतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तांब्याच्या बाटलीत पाणी ठेवण्याचे फायदे | Copper Bottle Cleaning Tips

तांब्याच्या बाटलीत पाणी ठेवून ते पिणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण यामध्ये नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे पाण्यात जर काही हानिकारक बॅक्टेरिया असेल तर ते नष्ट करण्याचे काम हे तांबे करते. तसेच पाण्याची पीएच पातळी देखील संतुलन राहते. यामुळे आपल्या आरोग्य चांगले राहते परंतु तांब्याच्या बाटलीत जर तुम्ही पाणी पीत असाल, तर त्या तांब्याच्या बाटलीची काळजी घेणे आणि स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते. अन्यथा त्याचे तुमच्या आरोग्यावर उलटे परिणाम होऊ शकतात. आता ही तांब्याची बाटली तुम्ही कशा प्रकारे साफ करू शकता?याची माहिती आपण जाणून घेऊया.

तांब्याची बाटली साफ कशी करायची | Copper Bottle Cleaning Tips

लिंबू आणि मीठ

तुम्ही लिंबू आणि मिठाचा वापर करून तांब्याची बॉटल साफ करू शकता. यासाठी तुम्ही अर्धे लिंबू कापून त्यावर थोडे मीठ शिंपडा आणि बाटलीच्या आत आणि बाहेरून घासून घ्या. लिंबाच्या रसामध्ये आम्ल असते आणि मीठ तांब्यावरील घाण काढून टाकण्यास मदत करते. यामुळे तांब्याची चमक कायम राहते आणि हानिकारक बॅक्टेरिया देखील काढून टाकले जातात.

विनेगर आणि मीठ

तुम्ही विनेगर आणि मिठाच्या सहाय्याने देखील तांब्याची बाटली साफ करू शकता. यासाठी तुम्ही एक कप विनेगरमध्ये एक चमचा मीठ वीज मिसळा. हे मिश्रण तुम्ही बाटलीच्या आत लावा आणि बाटली चांगली धुऊन घ्या. जेणेकरून हे विनेगर बाटलीच्या आत संपूर्ण पसरेल आणि ब्रशने तुम्ही घासून घ्या. एक दोन मिनिट ते तसेच राहू द्या आणि नंतर ते स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

बेकिंग सोडा आणि लिंबू

तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाची पेस्ट बनवून देखील तांब्याची बॉटल साफ करू शकता. तुम्ही ही पेस्ट बाटलीच्या आत आणि बाहेर लावा. आणि हलक्या हाताने स्क्रब करा. नंतर ही बॉटल पाण्याने धुऊन कोरडी करा. बेकिंग सोडा हा तांब्यावरील स्केलला नुकसान पोहोचू न देता त्यावरील सगळी घाण काढतो.

टोमॅटो पेस्ट

तुम्ही तांब्याच्या बाटलीवर टोमॅटोची पेस्ट लावून देखील बाटली साफ करू शकता. यासाठी तुम्ही दहा ते पंधरा मिनिटे टोमॅटोच्या रसाने बाटली घासत रहा. आणि नंतर पाण्याने धुवा टोमॅटोमध्ये असलेले ऍसिड तांब्याच्या पृष्ठभागावर असलेली सगळी घाण साफ करते आणि नैसर्गिक चमक देते.