Coriander Powder | संपूर्ण राज्यात हिवाळा चालू झालेला आहे. आणि या हिवाळ्याच्या महिन्यामध्ये पालेभाज्या तसेच कोथिंबीर या अत्यंत स्वस्त दरात मिळतात. तसेच हिरव्यागार भाज्या, वाटाणा, गाजर भाज्या हिवाळ्याच्या महिन्यात येत असल्याने त्या स्वस्त असतात. परंतु हिवाळा संपला की या भाज्या खूप महाग होतात. कोथिंबीर देखील या महिन्यांमध्ये खूप स्वस्त असते. परंतु हिवाळा संपला की, कोथिंबीरीची एक गड्डी जवळपास 30 ते 35 रुपयाला असते. तसेच कोथिंबीर देखील चांगली मिळत नाही. परंतु तुम्हीही कोथिंबीर स्वस्त असताना घेऊन तीच वाळवून वर्षभर टिकेल अशी पावडर करून ठेवू शकता. आता कोथिंबीरची पावडर करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. ती आपण जाणून घेणार आहोत.
तुम्ही जर कोथिंबिरीची पावडर (Coriander Powder) करून ठेवणार असाल, तर कोथिंबीर अगदी फ्रेश आणि हिरवीगार घ्या. त्यानंतर ती कोथिंबीर व्यवस्थित निवडा त्यातली सडकी आणि खराब असलेली कोथिंबीर वेगळी काढा. तसेच पिवळी पानं देखील घेऊ नका. त्यानंतर तुम्ही निवडून घेतलेली ही कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवा. आणि ओल्या फडक्याने पुसून घ्या. त्यानंतर तुम्हाला उन्हामध्येही कोथिंबीर पूर्णपणे वाळवायची आहे. तुम्ही उन्हामध्ये एका कापडावर ही कोथिंबीर पसरून वाळत घालू शकता.
पाच ते सहा तास ही कोथिंबीर चांगली वाळवायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पुन्हा तिला ऊन द्यायचे आहेत. जेणेकरून ती व्यवस्थित वाढेल ही कोथिंबीर योग्य प्रमाणात वाळली आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही कोथिंबीर थोडीशी हातावर घ्या आणि चुरून पहा. जर त्याची पावडर झाली. तर कोथिंबीर पूर्णपणे वाळलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीर हातावर चुरून देखील तिची पावडर करून ठेवू शकता. किंवा मिक्सरमध्ये देखील बारीक करून ही पावडर करू शकता. तुम्ही ती कोथिंबीर जसेच्या तसे डब्यात ठेवा आणि जेव्हा लागेल तेव्हा या कोथिंबीरीच्या पावडरचा वापर करा. ही कोथिंबीरीची पावडर तुम्ही वरण, भाज्या, ढोकळा, इडली, ताक पराठे यांसारख्या रेसिपीमध्ये वापरू शकता. तसेच या कोथिंबीरीच्या पावडरला वास देखील चांगला येतो.