पारनेरच्या जवाहर नवोदय विद्यालयात कोरोनाचा विस्फोट, 48 विद्यार्थ्यांसह 51 जणांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही महिन्यांच्या दिलास्यानंतर आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने महाराष्ट्राला आपल्या ताब्यात घेण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोविड संसर्गाच्या प्रकरणांनी मोठी झेप घेतली आहे. कोविड-19 च्या नवीन व्हेरिएन्टमुळे राज्यातील परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. देशात ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दरम्यान, राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातून कोविडची एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयात 48 विद्यार्थ्यांसह 51 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

शनिवारी शाळेत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 19 होती, जी आता 50 च्या पुढे गेली आहे. यापूर्वी पारनेर तहसीलच्या निवासी शाळेतील 19 विद्यार्थ्यांनाही कोविडची लागण झाल्याचे आढळून आले होते. शाळेत 5 वी ते 12 वी पर्यंत 400 हून जास्त विद्यार्थी शिकतात. जवाहर विद्यालयात बाधित आढळलेल्या सर्वांना वेगळे करण्यात आले आहे

बहुतांश विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यामध्ये गंभीर आजाराची लक्षणे नसल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांनी पुन्हा एकदा सर्वांनाच चिंतेत टाकले आहे. केंद्रीय नवोदय विद्यालय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते.

पारनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी पीटीआय-भाषाला सांगितले की,”सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या आरटी-पीसीआर चाचण्या करण्यात आल्या.” ते म्हणाले की, आतापर्यंत जवाहर नवोदय विद्यालयातील 48 विद्यार्थी आणि तीन कर्मचारी यांच्यासह 51 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. सर्वांना वेगळे करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.”

देशात ओमिक्रॉनची प्रकरणे समोर येत आहेत. आता कोविडच्या नवीन प्रकारांची एकूण 455 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे आहेत. राज्यात आतापर्यंत 110 लोकांना नवीन व्हेरिएन्टचा फटका बसला आहे. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय राजधानी दिल्ली आहे, जिथे ओमिक्रॉनची 79 प्रकरणे आहेत.

Leave a Comment