औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. आज शहरात पुन्हा नवीन ५९ कोरोनाग्रस्त सापडले असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता १ हजार पार गेली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
#औरंगाबाद शहरात आज 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1021 झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. या सविस्तर बातमीसाठी https://t.co/3Hiu4bssMS या लिंकवर क्लिक करा#COVID__19 #COVID #Corona pic.twitter.com/2o9BnKvMUy
— DIST. INFORMATION OFFICE CHHATRAPATI SAMBHAJINAGAR (@InfoCSNagar) May 18, 2020
औरंगाबाद शहरात आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. पैठण गेट, सब्जी मंडी (1), किराडपुरा (1), सेव्हन हिल कॉलनी (1), एन-6 सिडको (1), बायजीपुरा (1), रोशन नगर (1), न्याय नगर (3), बहादूरपुरा, बंजारा कॉलनी, गल्ली नं.2 (4), हुसेन कॉलनी (4), पुंडलिक नगर (2), हनुमान नगर (1), संजय नगर, गल्ली नं. पाच (1), हिमायत बाग, एन-13 सिडको (1), मदनी चौक (2), सादाफ कॉलनी (1), सिल्क मील कॉलनी (8), मकसूद कॉलनी (6), जुना मोंढा (11), भवानी नगर (5), हिमायत बाग, जलाल कॉलनी (3), बेगमपुरा (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 27 महिला व 32 पुरुषांचा समावेश आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कंटेनमेंट झोन मध्ये नागरिकांना बाहेर पडण्यास पूर्ण मज्जाव करण्यात आला असून जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणावर आरोग्य तपासणी घेत आहे.