हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Corona Cases In India । महाराष्ट्रसह संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. एकीकडे वातावरणात सातत्याने बदल होत असताना दुसरीकडे कोरोना रुग्णाची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ३७५८ वर पोचली आहे. त्यात महाराष्ट्रातील ४८५ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आकडा बघता देशात पुन्हा लॉकडाउन होणार कि काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोणत्या राज्यात किती रुग्णसंख्या? Corona Cases In India-
देशात सक्रिय कोविड रुग्णांची (Corona Cases In India) संख्या ३७५८ झाली आहे. गेल्या २४ तासांत ३६३ नवीन संक्रमित रुग्ण आढळले, तर १८१८ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. आकडेवारीनुसार, केरळमध्ये सर्वाधिक १४०० कोरोना रुग्ण आहेत, महाराष्ट्रात ४८५ आणि दिल्लीत ४३६. गुजरातमध्ये ३२०, पश्चिम बंगालमध्ये २८७ आणि कर्नाटकमध्ये २३८ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये १९९ आणि उत्तर प्रदेशात १४९ कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये ६३ वर्षीय वृद्धाने आपला जीव गमवला आहे, मात्र त्याला इतरही कोणता आजार होता असं बोललं जातंय. तर केरळमध्ये २४ वर्षीय महिलेचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. Corona Cases In India
महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या अहवालानुसार, रविवारी राज्यात कोरोनाचे 65 नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी 22 रुग्ण हे मुंबईतील आहेत, 25 रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर ठाण्यातून ९, पिंपरी-चिंचवड मधील ६, कोल्हापुरात २ आणि नागपुरात १ कोरोना रुग्ण आढळला आहे. जानेवारीपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे एकूण ८ रुग्णांचा बळी गेला आहे. मात्र यातील ७ रुग्णांना इतर आजारही होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारी २०२५ पासून मुंबईत ४११ रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून राज्यात १०,३२४ कोविड-१९ चाचण्या घेण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये ६८१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि आरोग्य विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे, मास्क घालण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन केलं आहे.