औरंगाबाद | जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे 42 शाळा पुन्हा बंद केल्या आहेत. सध्या ग्रामीण भागातील आठवी ते बारावीच्या 75 टक्के शाळा सुरू असून, विद्यार्थ्यांची 50 टक्के उपस्थिती असल्याचे शिक्षण विभागाच्या संकलित आकडेवारीतून दिसून येत आहे. खबरदारी म्हणून 42 शाळा बंद केल्या आहेत. मात्र, पुन्हा काही शाळांची पाहणी करून शाळा सुरू करण्यात येतील, असे शिक्षण अधिकारी डॉक्टर बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी व शहरातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय टास्कफोर्स समितीच्या विरोधामुळे स्थगित करावा लागला. मात्र कोरोनामुक्त क्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्षपणे जुलैपासून सुरू झालेले आहेत. जिल्ह्यातील एकूण 128 केंद्रांमध्ये आठवी ते बारावी एकूण 907 शाळा आहेत. यामध्ये आठवी ते बारावीचे विद्यार्थी संख्या 1 लाख 22 हजार 349 आहे. त्यापैकी 336 शाळा मागील एक महिन्यांपासून 50% विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरळीत सुरू आहेत. नियमित उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सात हजारांपेक्षा जास्त आहे.
औरंगाबाद -105, गंगापूर -82, कन्नड – 52 खुलताबाद – 54, पैठण – 71, फुलंब्री – 71, सिल्लोड – 121, सोयगाव -121 ही
तालुकानिहाय सुरू असलेल्या शाळा व विद्यार्थ्यांची संख्या आहे.