नवी दिल्ली वृत्तसंस्था: कोरोनाच्या संकट काळात सर्वत्र लॉकडाऊन आहे. लोक आपल्या जीवाची पर्वा करत घरातून बाहेर पडण्याचे टाळत आहेत. गर्भवती महिला कोरोनाकाळात विशेष काळजी घेताना दिसत आहेत. मात्र कोरोनाच्या संकटकाळात छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात DSP या पदावर कार्यरत असणाऱ्या शिल्पा साहू पाच महिन्याच्या गर्भावती असताना चक्क रस्त्यावर उतरून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.
छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात डीएसपी या पदावर शिल्पा साहू कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी आपल्या लग्नामुळेही त्या चर्चेत आल्या होत्या. लग्नानंतर आपल्या पतीसोबत नक्षलविरोधी अभियानातही त्या सहभागी होत असल्याने त्यांची जोरदार चर्चा होती. आता त्या गर्भवती आहेत. या कोरोना संकटात आणि भर उन्हात आपल्या घरातून बाहेर पडत त्या रस्त्यावर उभा राहून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.
कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन डीएसपी शिल्पा साहू करताना दिसत आहेत. छत्तीसगड नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. गरोदर असताना ही शिल्पा साहू या ना कोरोनाला घाबरतात ना नक्षलवाद्याना आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडण्यासाठी त्या रस्त्यावर उतरल्या आहेत.