औरंगाबाद | गेल्या वर्षभरात कोरोना जिल्ह्यातील तीन हजारांवर नागरिकांचे जीव घेतले आहेत. गुरुवारी दिनांक 20 रोजी झालेल्या 24 रुग्णाच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील कोरोना बळीचा एकूण आकडा तीन हजारांवर गेला. धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा दुसऱ्या लाटेत अवघ्या 38 दिवसांमध्ये जिल्ह्यातील एक हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तर पाच एप्रिल रोजी कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची पहिली नोंद झाली. कोरूनाची पहिली लाट जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली.त्या तुलनेत मृत्यूचा आकडा मात्र कमी राहिला. 2019 मध्ये मार्च-एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युदर यासोबतच बाधितांचे संख्या वाढली त्यामुळे दुसऱ्या लाट सर्वाधिक धोकादायक ठरली.
जिल्ह्यात गुरुवारी 530 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली आणि जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 39 हजार 143 झाली आहे. दिवसभरात 589 जणांना (मनपा 117 ग्रामीण 472) सुट्टी देण्यात आली.आज पर्यंत एक लाख 29 हजार 878 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परत नाही मराठी घाटी व खासगी रुग्णालय 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने,जिल्ह्यातील एकूण कोरोना बळीची संख्या 3005 वर पोहोचले आहेत. तर सध्या जिल्ह्यात 6,260 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.