व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मुंबई पोलीस दलातील आणखी एका पोलिसाचा कोरोनाने मृत्यू; बळींची संख्या झाली ८

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही आता या विषाणूनं विळखा घातला आहे. कोरोनाच्या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात आज (शनिवारी) आठवा बळी गेला. त्यामुळे पोलीस दलात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या जीवाला अधिक धोका वाढून परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

सविस्तर माहितीनुसार शाहूनगर पोलीस ठाण्यातील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक ताप आणि सर्दी यामुळे आजारी होते. दरम्यान, त्यांनी सायन रुग्णालयात कोरोनाची चाचणी केली होती आणि त्याचा रिपोर्ट आज (शनिवार) पॉझिटिव्ह आला. मात्र, आजच पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ते राहत्या घरी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना सायन रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले अशी महती पोलिसांनी दिली.

ताज्या आकडेवारीनुसार, राज्यभरात आत्तापर्यंत १ हजार १४० पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यांमध्ये १२० अधिकारी आणि १ हजार २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यांपैकी ८६२ पोलिसांवर सध्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत, तर २६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच राज्यात एकूण १० पोलिसांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. यांमध्ये मुंबई पोलीस दलातील आता ८ पोलिसांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”