‘या’ तारखेपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढला कहर ,पंधरा दिवसापासून धक्कादायक आकडा; काळजी घेण्याचे आवाहन

औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा प्रतिदिन वाढत चालला आहे. यामुळे सर्वाधिक चिंतेत भर पडली आहे. ११ मार्चपासून औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. ११ ते २४ मार्चपर्यत प्रतिदिन येणारा आकडा हा धक्कादायक असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता आकडा पाहिला तर १० मार्चपर्यत पाचशे पर्यत कोरोनाचे रुग्ण प्रतिदिन आढळून येत होते. १० मार्च पर्यत औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा ५४ हजार ४३९ वर होता. परंतु ११ मार्च रोजी जिल्ह्यातील दिवसभरात येणाऱ्या कोरोनाच्या अहवालानुसार एकाच दिवशी धक्कादायक आकडा समोर आला. एकाच दिवशी ९०२ रुग्णाची भर पडली आणि औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा हा ५५ हजार ३४१ वर जाऊन पोहोचला. त्यामुळे चिंता आणखी वाढली. त्यानंतरचा कोरोनाच्या रुग्णांचा अहवालानुसार प्रतिदिन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. ११ ते २४ मार्च दरम्यान प्रचंड कोरोनाची रुग्णसंख्या वाढली आहे. ११ तारखेला केवळ जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही ५५ हजार ३४१ वर होती. तर ती काल रात्रीपर्यंतच्या अहवालानुसार ७२ हजार २५३ वर जाऊन पोहोचली आहे.

…अशी वाढली रुग्णसंख्या
११ मार्च ला ९०२ कोरोनाचे रुग्ण एकाच दिवशी आढळून आले. त्यानंतर १२ मार्चचा अहवालानुसार कोरोनाची रुग्णसंख्या दिवसभरात कमी म्हणजे ६१७ आढळून आली. त्यामुळे दिलासा मिळाला. परंतु १३ मार्च ला एकाच दिवशी ७२० कोरोनाचे रुग्ण वाढले आणि १४ तारखेला तर एकाच दिवशी तब्बल १०२३ कोरोनाच्या रुग्णांची भर पडली. त्यानंतर हजारांहून अधिक रुग्णसंख्या प्रतिदिन आढळून आली आहे. १५ मार्च ला एकाच दिवशी ११२८ रुग्ण आढळून आले आहेत. तर १६ तारखेला १२७१, १७ तारखेला १३३५, १८ मार्चला १५५७ रुग्ण आढळून आले. याशिवाय १९ तारखेचा दिवसभरातील कोरोनाचा आकडा पाहिला तर १२५१ रुग्ण आढळून आले. २० मार्च ला १६७९, २१ ला १४३२, २२ ला १४०६, २३ तारखेला १७९१ आणि काल दि. २४ मार्च ला एकाच दिवशी १७०२ कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने चिंता आणखी वाढली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like