देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा २३ हजारा पार; गेल्या २४ तासात १६८४ नवे करोना रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशभरात गेल्या २४ तासात १६८४ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या २३ हजार ७७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मागील २८ दिवसात देशातल्या १५ जिल्ह्यांमध्ये एकही नवा करोना रुग्ण आढळलेला नाही. तर ८० जिल्हे असे आहेत जिथे मागील १४ दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळला नाही असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. आत्तापर्यंत देशातील ७१८ जणांनी आपले प्राण कोरोनामुळे गमावले आहेत. देशातील ४ हजार ७४९ जणांवर उपचार यशस्वी ठरल्याचीही माहिती अग्रवाल यांनी दिली. तसेच देशातील वेगवेगळ्या ठिकाणी १७ हजर ८१० रुग्णांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण २०.५७ टक्के असल्याचंही त्यांनी म्हटलं.

केंद्र सरकारने दिलेले निर्देश हे लॉकडाउनच्या काळात योग्य पद्धतीने पाठवले गेले पाहिजेत. ज्यामुळे आर्थिक चक्र रुळावर येण्यासाठी हळूहळू मदत होईल असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढते आहे तिथे जास्त लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. करोना हा इतर साथीच्या रोगांसारखाच बरा होणारा आजार आहे. मात्र याचा रुग्ण त्वरित लक्षात येणं आवश्यक आहे असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं. COVID 19 नावाचे ट्विटर हँडलही तयार केलं जाणार असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

गृहमंत्रालयानं आज चार अतिरिक्त आंतर-मंत्रालय टीम गठीत केल्यात. या अगोदर केंद्राकडून ६ टीम्स गठीत करण्यात आल्या होत्या. या प्रत्येक टीमचं नेतृत्व अतिरिक्त सचिव स्तराच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलंय. अहमदाबाद, सूरत, हैदराबाद आणि चेन्नईसाठी या टीम गठीत करण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. जे भाग हॉटस्पॉट नाहीत तिथं काही प्रमाणात सूट देण्यात आलीय. काही ठिकाणी आर्थिक देवाण-घेवाण आणि उद्योगांसंबंधीत चुकीच्या समजुती होत्या. यासंबंधी गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना एक पत्रंही धाडलंय. कोणत्याही फॅक्टरीमध्ये संक्रमण झालं तर मालकांना शिक्षा होणार नाही, असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय. नागरिकांपर्यंत माहिती योग्य पद्धतीने पोहचेल याची काळजी राज्यांनी घ्यावी, असंही केंद्रानं म्हटलं आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews.”

 

Leave a Comment