व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाने डोकेदुखी वाढली : सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट 22 टक्क्यांवर

सातारा | सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 964 जण बाधित आढळले आहेत. कोरोना बाधिताचा आकडा दिवसेंन दिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 21.9 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 567 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 964 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 21.9 टक्के आला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात 178 जणांना विविध रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर केवळ एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत 2 हजार 927 जण उपचार्थ आहेत.

गृह विलगीकरणातील नागरिकांनी प्रकृतीची माहिती यंत्रणेला कळवावी
रॅपिड ॲन्टेजन चाचणी अथवा होम किटद्वारे पॉझिटिव्ह आलेल्या आणि गृह विलगीकरणातील नागरिकांनी आपल्या प्रकृतीची माहिती आरोग्य यंत्रणेला देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोविड विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार वाढत असल्याने बरेचसे नागरिक रॅपिट ॲन्टीजन चाचणी करुन घेतात. पॉझिटिव्ह आल्यास गृह विलगीकरणात उपचार घेतात. मात्र त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यास आरोग्य यंत्रणेवर ताण येवू शकतो. त्यामुळे या नागरिकांच्या दैनंदिन प्रकृतीवर लक्ष ठेवणे सोपे व्हावे, त्यांना आरोग्य सुविधा देण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा स्थानिक आरोग्य यंत्रणेला आपली माहिती कळवावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.