Cipla ऑगस्टमध्ये बाजारात आणत आहे कोरोनावरील औषध Ciplenza; एका टॅबलेटची किंमत असेल 68 रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीची फार्मा कंपनी सिप्ला ऑगस्टमध्ये फॅवीपिराविर हे औषध दाखल करणार आहे. याचा उपयोग कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी केला जाईल. मीडिया रिपोर्टनुसार सीएसआयआर अर्थात CSIR-Council of Scientific & Industrial Research यांनी कमी किमतीत हे औषध तयार केले आहे. सिप्लाला हे औषध लॉन्च करण्यासाठी डीसीजीआय कडून परवानगी मिळालेली आहे. सिप्ला हे औषध ‘Ciplenza’ या ब्रँड नावाने भारतात सुरू करणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच ते बाजारात येईल. या औषधाच्या एका टॅब्लेटची किंमत 68 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

सीएनबीसी-टीव्ही 18 च्या वृत्तानुसार, सिप्लाने त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीत औषध तयार करण्याच्या प्रक्रियेस गती दिली आहे. डीसीजीआयने देशातील आपत्कालीन परिस्थितीत फॅवीपिराविरच्या वापरास परवानगी दिलेली आहे, यामुळे सिप्ला लवकरच हे उत्पादन कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात आणणार आहे.

सिप्ला नवीन तंत्रज्ञानाद्वारे हे औषध बनवित आहे. यासह, या औषधाची किंमत बर्‍यापैकी खाली आली आहे. अल्पावधीतच सिप्ला हे औषध मोठ्या प्रमाणावर तयार करेल.

मूळतः फुजी फार्मा या जपानी कंपनीने हे औषध तयार केले आहे. क्लिनिकल चाचण्यांमध्ये फॅवीपिराविरने चांगले निकाल दिले आहेत. हे औषध कमी आणि मध्यम पातळीवर संसर्ग असलेल्यांवर उपचार करण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. सीएसआयआरने देशात उपलब्ध रसायनांचा वापर करून या औषधासाठी एक सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय) तयार केला आहे. त्यानंतर त्यांनी हे औषध निर्मितीसाठी सिप्लाला दिले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment