सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात कोरोना काही दिवसापूर्वी आटोक्यात आले असे वाटत असतानाच मंगळवारी (दि 16) कोरोनाचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. गेल्या महिन्यात काही दिवसापासून आटोक्यात असणाऱ्या कोरोनाचे तब्बल एका दिवसात 308 जण बाधित आढळले आहेत.
सातारा जिल्ह्यात जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात काही प्रमाणात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र मार्च महिन्यात हे प्रमाण हळूहळू वाढू लागले, या तीन महिन्यात प्रथम तब्बल एका दिवसात ३०८ जण बाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज पर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा 61334 आकडा झाला. तर जिल्ह्यात एकूण 57457 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 1874 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या जिल्ह्यात 1696 उपचारार्थ दाखल रुग्ण आहेत. जिल्ह्यात जिल्हाधिकारी तसेच प्रशासनाने लावलेले निर्बंध व त्यावरील कारवाई कोठेच होताना दिसत नाही . त्यामुळे दिवसेंदिवस कोरणा बाधित यांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांची वाढणारी संख्या जिल्ह्यासाठी चिंताजनक असताना, लोकांच्यात कोणतेही गांभीर्य दिसत नाही. तसेच प्रशासनाचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.