कोरोना काळात हॉटेलमध्ये खाणं कितपत सुरक्षित? शास्त्रज्ञ म्हणतात…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना महामारी आता पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधील नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. तर राजधानी दिल्लीतही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. ज्या वेगाने कोरोना व्हायरस वेगाने आपले हात पाय पसरत आहे. हे पाहता संशोधक कोरोनाच्या प्रसाराची कारणं शोधण्यासाठी संशोधन करत आहेत.

अमेरिकेतील हार्वर्ड टिएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या वैज्ञानिकांद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट करण्यात आलं की, विमानांमध्ये व्हेंटिलेशन सिस्टीम व्यवस्थित असल्यामुळे हवा नेहमी शुद्ध राहते. परिणामी संक्रमणाचा धोका कमी होतो. याऊलट व्हेंटिलेशन सिस्टिम व्यवस्थित नसेल तर कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरू शकते. त्याचप्रमाणे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये जास्त लोकांसह बसून जेवण करणं धोकादायक ठरू शकतं. किराणा सामान घेण्यासाठी दुकानात जास्तवेळ थांबल्यास गर्दी झाल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो.

अमेरिकेतील मॅसाचुसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआईटी)च्या अर्नोल्ड आय बार्नेट यांसह इतर संशोधनकांनी सांगितले की, एचईपीए फिल्टर विमानांमध्ये योग्य पद्धतीने काम करत नाहीत. त्यामुळे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. भारतातील एमआयटीच्या एका तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोनाच्या संक्रमणाबाबत अजूनही स्पष्टपणे काही सांगता येत नाही. संसर्गापासून बचावासाठी साफ-सफाई, सोशल डिस्टेंसिंग, सॅनिटायजेशन या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment