म्हणून ‘त्या’ कोरोना बाधित रुग्णावर दाखल करण्यात आला गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सातारा येथे आजीच्या अंत्यविधीसाठी जाऊन आल्यानंतर कर्नाळ येथील एका ४० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्या तो व्यक्ती सातारा येथून आल्यानंतर त्याला १४ दिवसांच्या होम कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून तो बाहेर फिरत होता. त्याला वारंवार सांगूनही तो ऐकत नसल्याने त्याच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कर्नाळ गावच्या तलाठी सौ. प्रगल्भा अजित कल्लणावर यांनी दिली आहे.

कोतीज येथील त्या मुंबईच्या कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे. कर्नाळमधील सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकाचे निधन झाले होते. त्याच्या अंत्यसंस्कारासाठी तो साताऱ्याला गेला होता. त्यावेळी त्यांचे काही नातेवाईक मुंबईहून आले होते त्याच्या संपर्कात कर्नाळमधील ती व्यक्ती आली होती. सातारा मधील त्या ठिकाणच्या काही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे त्या नंतर स्पष्ट झाले. याबाबतची माहिती सातारा जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आली होती. सांगली जिल्हा प्रशासनाला ती माहिती मिळतात तात्काळ करणार मध्ये आरोग्य यंत्रणेने धाव घेतली संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले. यावरून कर्नाळ येथील त्या इसमाचे स्वाब घेतले होते. त्या व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल रविवारी संध्याकाळी पॉझिटिव आला. हा व्यक्ती सातारा येथून आल्यानंतर त्याला १४ दिवसांच्या होम कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले होते.

मात्र, तो कोरोना बाधित घरात न बसता वारंवार बाहेर, कर्नाळ गावातून फिरत होता. त्याला प्रशासकीय आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगूनही तो घरात बसत नव्हता. सदरची घटना हि २० एप्रिल ते २ मे या दरम्यान घडली. ३ मे रोजी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच खळबळ उडाली होती. या कोरोना बाधितावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत तसेच संचारबंदी कलम १८८, २६९, २७१, २९० या अंतर्गत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद कर्नाळ गावच्या तलाठी सौ. प्रगल्भा अजित कल्लणावर यांनी दिली आहे.

Leave a Comment