खळबळजनक! चार वेळा निगेटिव्ह अहवाल येऊनही कोरोना रुग्णाचा मृत्यू

औरंगाबाद : कोरोना महामारीचे संकट काही केल्या कमी होताना दिसत नाही. यातच आता सोयगाव तालुक्यातील पिंपरी येथे चार वेळा नकारात्मक अहवाल येऊन सुद्धा एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सोयगाव तालुका पिंपरी या ठिकाणी राहत असलेले आधार बाबुराव सोनवणे (वय 66 रा. पिंपरी) यांना काही दिवसापूर्वी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यामुळे जरंडी येथील कोविड केंद्रात त्यांची अँटीजेन चाचणी करण्यात आली होती. यावेळी चाचणी नकारात्मक आल्यामुळे त्यांना औषध देऊन घरी पाठवण्यात आले. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी त्यांना तसाच त्रास जाणवल्याने त्यांनी पुन्हा तपासणी केली असता पुन्हा त्यांचा अहवाल नकारात्मक आला. सलग चार वेळा त्यांचा अहवाल नकारात्मक आला. नंतर कुटुंबियातील सर्वांची कोरोना चाचणी केल्यावर त्यांचाही अहवाल नकारात्मक आला. परंतु रुग्णाचा श्वास घेण्यास अजून त्रास होत असल्याने त्यांची ऑक्सिजन पातळी 89 वर पोहोचली. यानंतर त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु या रुग्णाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोरोना अहवाल नकारात्मक आल्याने सोयगाव तालुक्यात काही प्रमाणात आटोक्यात आलेल्या कोरोना संसर्गाने वेगळंच रूप घेतल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या रुग्णाला ऑक्सिजन व्यतिरिक्त कोणताही त्रास होत नव्हता. पण तरीही सातत्याने अहवाल नकारात्मक आढळत होता. त्यामुळे कोरोना संसर्गाचा नवीन व्हायरस सोयगाव तालुक्यात रुजु झाल्याचा संशय बळावला आहे.

जरंडीच्या कोविड केंद्रात अनेक रुग्णांनी हिंमत धरून कोरोना संसर्गावर मात करून ते घरी परतले तरीही जिल्हा प्रशासनाने या केंद्रात ऑक्सिजन यंत्रणा बसवली नाही त्यामुळे ऑक्सिजन अभावी सोयगाव तालुक्यात 55 जणांचे बळी गेले आहेत. या जिल्हा प्रशासनाला याबाबत दखल घेतली नाही अशी माहिती समोर आली आहे.