घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे प्रचंड हाल, एकाच बेडवर तीन रुग्ण; बेडअभावी रुग्णांना झोपावे लागते फरशीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट केले आहे.

श्वेता महाले यांनी फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ऑक्सिजनची नळी नाकाला लावून हे रुग्ण उपचार घेत असल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे. सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे. तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे जीव वाचतील.

तसेच कोरानाच्या संकटामधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील ही परिस्थिती भयावह आहे, अशी टीका श्वेता महाले यांनी सरकारवर केली आहे. दरम्यान, राज्यात बुधवारी 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment