अमरावतीत रात्री ऊशीरा पुन्हा २ पुरूष कोरोना पोझीटीव्ह, एकूण रुग्णसंख्या ७८ वर

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विदर्भातही कोरोनाने चांगलेच पाय पसरले असून अमरावती शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. शुक्रवारी रात्री उशिरा अमरावतीत पुहा २ नवीन रुग्णांची भर पडली असून आता जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या ७८ वर पोहोचली आहे.

अमरावती मधे काल रात्री ऊशीरा प्राप्त अहवालानुसार मसानगंज व हैदरपूरा या भागातील २ पुरूषांचा कोरोना अहवाल पोझीटीव्ह आलेला आहे. सदर दोनही पुरूष हे ५३ वर्षे व ३६ वर्षे वयाचे आहेत. सदर दोघेहि कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. कोरोना बाधितांचे निकटवर्तीय म्हणून यापूर्वीच त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.

दरम्यान, अमरावतीमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. आत्तापर्यंत अमरावती जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ११ जणांचा बळी गेला आहे. वाढती रुग्णसंख्य अमरावतीकरांची चिंता वाढवणारी ठरत आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like