कोरोनाचा काळ आणि लग्नदेखील जमत नाही ! ‘या’ नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशाला कोरोनाच्या संकटाने ग्रासले आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काही जणांना आपले काम सोडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक लोकांना नैराश्य येत आहे. या नैराश्यातून हिंगोली जिल्ह्यातील खंडाळा या ठिकाणी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. तसेच त्याचे लग्नसुद्धा जमत नव्हते. रविवारी पहाटे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मृत व्यक्तीचे नाव सचिन गोविंदराव गायकवाड असे आहे तो खंडाळा याठिकाणी आपल्या आई वडिलांसोबत राहात होता.मागील काही दिवसांपासून अनेक प्रयत्न करूनदेखील त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. त्यामुळे त्याला एकटेपणा जाणवू लागला होता. लग्न जमत नाही आणि त्यात कोरोनाचा काळ या दुहेरी परिस्थितीमुळे तो नैराश्यात गेला होता. त्यातून अखेर शेवटी त्याने रविवारी पहाटे 2 च्या सुमारास आपल्या राहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

सकाळी त्याचे आईवडील जागे झाले तेव्हा त्यांना सचिनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला. तो मृतदेह बघून सचिनच्या घरच्यांना चांगलाच धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके आपल्या पोलीस पथकाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहाणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. अर्जुन गायकवाड यांच्या माहितीवरून हिंगोली ग्रामीण पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment