Wednesday, February 1, 2023

जालना जिल्यात कोरोनाने मृत्यूचा कहर…

- Advertisement -

जालना : जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. तरीही मृत्यूदर म्हणावे तसा कमी झालेला नाही. सोबतच म्युकोरमायकोसिसचा धोका जिल्यात डोकेवर काढत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असेल तरी, मृत्यूदर कमी झाल्या शिवाय चिंतेचे वातावरण जिल्ह्यात असणार आहे.

जून महिन्यात २८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि प्रत्येकजण बरा होऊन घरी जाण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर प्रयत्न करत आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्या नुसार जिल्ह्यात सर्वानी कोरोना नियमावलीचे पालन करावे आणि काही त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जेणेकरून तातडीने उपचार करता येतील, तसेच कोरोनाला रोखता येईल असे जाणकार सांगत आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात २९ नव्या बाधितांची नोंद झाली असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनावर मात केलेल्या ६९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, जालना शहर ८, पिंपरखेड १, कुंभेफळ १, मंठा २, ढोकसळ १, जयपूर १, पांढुरणा १, पाटोदा १, घनसावंगी तालुक्यातील घानेगाव १, कुंभारपिंपळगाव १, अंबड शहर २, भलाडी १, गोंदी १, बदनापूर तालुक्यातील चणेगाव १, जाफराबाद तालुक्यातील कचनेरा १, टेंभुर्णी १, भोकरदन तालुक्यातील आन्‍वा २, कोडा १, उंबरखेडा १ अशाप्रकारे आरटीपीसीआरद्वारे २३ तर अँटिजन तपासणीद्वारे ६ असे एकूण २९ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली.