औरंगाबाद | गेल्या आठवडाभरापासून सातत्याने कारोनाबाधितांची त्यांची संख्या घसरत आहे. मागील दोन वर्षापासून नव्याने आढळणार्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीनशेच्या टप्प्याकडे सरकत आहे. रविवारी जिल्ह्यात 377 रुग्ण आढळले, तर सोमवारी केवळ 326 रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचा आकडा ही किंचित खाली आल्याने जिल्ह्यात दिलासादायक चित्र दिसत आहे.
सोमवारी शहरात 121 रुग्ण तर ग्रामीण भागात 205 असे एकूण 326 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1,40,737 झाली आहे. दिवसभरात 581 जणांना (मनपा 195, ग्रामीण 386) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 1,32,361 नागरीक कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंत जिल्ह्यात एकूण 3092 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 5284 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
घाटीत सोमवारी सिल्लोड आमसरी येथील 75 वर्षेय पुरुष, नूर कॉलनीतील 42 वर्षीय पुरुष, फतियाबाद येथील साठ वर्षेय पुरुष, औरंगाबाद नक्षत्रवाडीतील 68 वर्षीय पुरुष, किराडपुरा येथील 65 वर्षीय पुरुष, पैठण येथील 51 वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील 85 वर्षीय महिला, कन्नड- शेळगाव येथील 65 वर्षीय महिला, मोंढा तांडा येथील 40 वर्षीय पुरूष,जिल्हा सामान्य रुग्णालय बजाजनगरातील 32 वर्षीय महिला, भिमनगर, भावसिंगपुरा येथील 73 वर्षीय महिला, तसेच खासगी रुग्णालयात शरणपूर येथील 73 वर्षीय पुरुष, पैठणमधील 65 वर्षीय पुरुष, पिंपळवाडीतील 31 वर्षीय पुरुष, औरंगाबाद एन – 8 मधील 81 वर्षीय पुरुष, मुकुंदवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, बन्सीलाल नगरातील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला.