Sunday, April 2, 2023

संक्रमित पत्नीला घेऊन फिरला पण कुठेच मिळाला नाही बेड; महिलेने दुःखी होऊन घेतला ‘हा’टोकाचा निर्णय

- Advertisement -

पुणे । संपूर्ण देश कोरोना विषाणूमुळे घाबरून गेला आहे, साथीच्या आजारांची दुसरी लाट अनियंत्रित होत आहे. संक्रमित रूग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये आयसीयू आणि ऑक्सिजन खूप दूरची गोष्ट आहे. आता सामान्य बेडदेखील उपलब्ध नाहीत. महाराष्ट्र पुण्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. लोक आता असे म्हणू लागले की, आता सगळकाही ईश्वरावर आहे. ह्या व्हायरसमुळे कोण वाचत कोण नाही हे माहित नाही. येथे, एका पोजीटीव्ह महिलेला तिचा नवरा रुग्णालयात दाखल करण्यासाठी चक्कर मारत राहिला. पण बेड पूर्ण भरल्यामुळे कोणीही तिला ऍडमिट केले नाही. अखेर या महिलेने दु:खी होऊन आत्महत्या केली.

असहाय पती संक्रमित पत्नीला घेऊन भटकत राहिला:
वास्तविक ही हृदयस्पर्शी बातमी पुणे शहरातील वारजे भागातील आहे, जिथे 41 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. 12 एप्रिल रोजी संध्याकाळी तिच्या नवऱ्याने तिची कोरोना तपासणी केली. तेव्हा तिचा अहवाल सकारात्मक झाला. यानंतर तिचा असहाय पती पत्नीच्या उपचारासाठी एका हॉस्पिटलमधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये जात राहिला. पण प्रत्येक ठिकाणाहून बेड रिकामे नाही म्हणून परत आला.

- Advertisement -

महिलेने दुःखी होऊन फाशी घेतली:
पुणे शहरातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांना भेट दिल्यानंतर अखेर निराश पतीने आपल्या पत्नीला घरी आणले. पती आपल्या नशिबावर दुःखी होता की, पत्नीला रुग्णालयात प्रवेशही मिळवून देऊ शकला नाही. त्याचवेळी महिलेला ऑक्सिजन न मिळाल्यामुले त्रासही होत होता. अखेर दुसर्‍याच दिवशी तिने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. आणि आयुष्य संपवले. झालेल्या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.